विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील विद्याथ्र्यांचा योग व निसर्गोपचार संबंधी अभ्यास दौरा

अमरावती (दि. 24.02.2026) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत येणा-या पी. जी. डिप्लोमा इन योग थेरपी या अभ्यासक्रमाच्या विद्याथ्र्यांकरिता हरिद्वार येथे अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे दि. 24 फेब्राुवारी ते 02 मार्च या कालावधीत सदर आयोजित करण्यात आला असून विद्याथ्र्यांना प्रत्यक्ष अनुभवातून योग व निसर्गोपचार पध्दतीचे सखोल ज्ञान मिळावे, या उद्देशाने या अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे.
अभ्यास दौ-यादरम्यान हरिद्वार येथील गायत्री शक्तीपीठ, देव संस्कृती विश्वविद्यालय, परमार्थ निकेतन येथे भेट देऊन विविध आध्यात्मिक आणि शैक्षणिक अशा विविध प्रकारचे शिक्षण, साधना तसेच संशोधनकार्य करता येते. देव संस्कृती विश्वविद्यालय, हरिद्वार येथे योग, ध्यान, वेद, संस्कृत, अध्यात्मिक विज्ञान, भारतीय तत्त्वज्ञान आणि आयुर्वेद शिकण्याचे ठिकाण आहे. परमार्थ निकेतन ऋषिकेश येथे योग, ध्यान, पर्यावरण संवर्धन व गंगा आरती यासारख्या सांस्कृतिक उपक्रमांचा अभ्यास करण्याकरिता प्रसिध्द आहे.
गायत्री शक्तीपीठ येथे गायत्री मंत्र, यज्ञशास्त्र, आध्यात्मिक साधना आणि समाजसेवेवर आधारित जीवन तत्त्वज्ञान शिकता येईल. ही ठिकाणे भारतीय संस्कृती व अध्यात्मिक शिक्षणाचा अनमोल ठेवा जपणारी आहेत. या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या विद्याथ्र्यांना अद्यावत ज्ञानाबरोबरच संशोधन व विकासासाठी प्रेरणा मिळेल आणि विद्यार्थी रोजगाराभिमुख होऊन स्वतःचे स्वयंरोजगारासाठी तयार होतील.
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांची प्रेरणा व विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पी जी डिप्लोमाइन योग थेरपी या अभ्यासक्रमाच्या समन्वयक प्रा. राधिका खडके तसेच प्रा. आदित्य पुंड, डॉ. अनघा देशमुख यांच्या नेतृत्वात या अभ्यास दौ-याचे आयोजन करण्यात आले आहे.



