AmravatiLatest News

भावी शिक्षकांनी अनुभवला दादासाहेबांचा जीवनप्रवास; रामकृष्ण महाविद्यालयाची स्मारकास शैक्षणिक भेट

अमरावती: स्थानिक रामकृष्ण शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या (B.Ed. College) वतीने नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरातील नव्याने लोकार्पण झालेल्या ‘रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई स्मारकाला’ शैक्षणिक भेट देण्यात आली. भावी शिक्षकांना थोर समाजसुधारक आणि राजकीय नेत्यांच्या जीवनकार्याची ओळख व्हावी, या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते स्मारकातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, किऑस्क आणि माहिती फलकांमुळे विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक घटनांची सखोल माहिती जाणून घेतली. विशेषतः दादासाहेब गवई यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य आणि त्यांचा संविधानाप्रती असलेला आदर या विषयावर विद्यार्थ्यांनी चर्चा केली. निसर्गरम्य बाह्य परिसर आणि ज्ञानवर्धक अंतर्गत प्रदर्शन यांचा सुरेख संगम या ठिकाणी पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी स्मारकाच्या परिसरात काही काळ निसर्गाचा आनंद घेत समूह छायाचित्रेही काढली. अशा शैक्षणिक भेटींमुळे पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभूतीतून शिकण्याची संधी मिळते, अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.यावेळी या भेटीदरम्यान स्मारकाचे संपदा व्यवस्थापक धम्मदीप गवई, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक वृंद, स्मारकावरील कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button