Uncategorized

अ.भा. आंतर विद्यापीठ फुटबॉल (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती : युनिव्र्हसिटी ऑफ कॅलकटा, कोलकाता येथे 30 जानेवारी ते 09 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ फुटबॉल (पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
               चमूंमध्ये मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हाचा ऋतिक अतकर, प्रज्योत तायडे व ओम काशीकर, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा राज मिश्रा, दुकीवाकोर ही, ओमा हँग सुब्बा, झाकीएएसातुओ केट्स, राहुल कुमार, पल्डेन धोंडुप, अफर्मिंग त्लांग व सोनम तमंग, दयाभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळचा मोर्विन मोसेस, जी.एस. टोम्पे महाविद्यालय, चांदुरबाजारचा साहिल बेनिवाले व सुफियान अब्दुल, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा ओम धारव व मुस्तफा शेख, इंदिरा गांधी महाविद्यालय, राळेगांवचा अभिषेक बुटके व यश यादव, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा रोमान खान आणि श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा रफिक ए. खान याचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. पुरुष व महिला चमूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे 16 ते 24 व 27 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button