Latest NewsNandedSports

बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजची विद्यार्थीनी कु. पुनम बंगाळेला राज्यस्तरीय अश्वमेध क्रीडा महोत्सवात रजत पदक

नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या 27 व्या महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ अश्वमेध क्रीडा महोत्सवामध्ये बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजची बी.एस्सी. प्रथम वर्षाची विद्यार्थीनी कु. पुनम बंगाळे हिने रजत पदक पटकावून दैदिप्यमान यश संपादित केले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रभरातील सर्व विद्यापीठाचे हजारो खेळाडू अॅथलेटिक्स व इतर खेळांमध्ये सहभागी झाले होते.
                 कु. पुनम हिने यापूर्वी विद्यापीठस्तरीय 200 मीटर धाव स्पर्धा आणि 400 मीटर रिले रेस या दोन्ही स्पर्धा प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, मॉडेल डिग्री कॉलेजचे मानद संचालक डॉ. अण्णासाहेब म्हळसणे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. कु. पुनम हिचा महाविद्यालयीन स्तरावर सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सत्कार करून भरभरुन शुभेच्छा दिल्या. या यशामागे महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मोलाचे सहकार्य लाभले. भविष्यात कु. पुनम राष्ट्रीय पातळीवर नक्कीच मॉडेल डिग्री कॉलेजचे नांव आणखी उज्ज्वल करून देईल, असा विश्वास याप्रसंगी प्राचार्य डॉ. अण्णासाहेब म्हळसणे यांनी व्यक्त केला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button