AmravatiLatest NewsMaharashtra

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेचे ऑनलाईन प्रस्ताव स्वीकारण्यासाठी १२ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 31 : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ सन 2025–26 अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने प्रस्ताव स्वीकारण्यासाठी दि. 12 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती अपर आयुक्त संजय जाधव यांनी पत्राद्वारे दिली आहे.

दि. 3 फेब्रुवारी 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार या अभियान व स्पर्धेसाठी सर्व स्तरावरून प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 31 ऑक्टोबर 2025 अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, विधिमंडळ अधिवेशन तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे प्रस्ताव सादर करण्यास अडचणी निर्माण झाल्याने ही मुदत आता दि. 12 जानेवारी 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

या संदर्भात संबंधित विभागांनी त्यांच्या अधिनस्त सर्व कार्यालयांना आवश्यक त्या सूचना देण्याबाबत विभागीय आयुक्तालयामार्फत कळविण्यात आले आहे.

‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ अंतर्गत प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक असून, अभियान व स्पर्धेशी संबंधित सर्व अनुषंगिक बाबींवरील कार्यवाहीसाठी स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. सदर पोर्टलचा संकेतस्थळ दुवा “pragatiabhiyan.maharashtra.gov.in” असा असल्याची माहितीही विभागीय आयुक्तालयाने दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button