विद्यापीठात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती साजरी

अमरावती – (दि. 27.12.2025) संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती मोठ¬ा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था व नियमन केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, डॉ. भगवान फाळके, उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम, मुंबई विद्यापीठातील भाषा अभ्यासक व संशोधक डॉ. दिपक पवार तसेच विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्याबद्दल माहिती केंद्राचे समन्वयक डॉ. महेंद्र मेटे यांनी दिली.



