SHOCKING! 25 वर्षीय अभिनेत्रीची राहत्या घरी निर्घृण हत्या; प्रियकराला बेड्या

कलाविश्वाला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली असून, ब्रॉडवे फेम 25 वर्षीय अभिनेत्रीची तिच्या राहत्या घरी चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून, या घटनेमुळे मनोरंजनसृष्टीसह सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अभिनेत्री इमानी डिया स्मिथची हत्या
मृत अभिनेत्रीचे नाव इमानी डिया स्मिथ असून, ती *‘द लायन किंग’*च्या स्टेज वर्जनमधील तरुण नाला या भूमिकेमुळे प्रसिद्ध होती. प्राथमिक माहितीनुसार, 21 डिसेंबर 2025 रोजी न्यू जर्सीतील तिच्या ग्रोव अव्हेन्यू येथील निवासस्थानी तिचा मृतदेह अत्यंत रक्तरंजित अवस्थेत आढळून आला.
911 वर मिळालेल्या कॉलनंतर उघडकीस आली घटना
न्यू जर्सी काऊंटी कार्यालयाने जारी केलेल्या अधिकृत माहितीनुसार,
21 डिसेंबर रोजी सकाळी 9.18 वाजता आपत्कालीन क्रमांक 911 वर या घटनेबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता इमानीच्या शरीरावर अनेक वार केल्याचे स्पष्ट दिसून आले. तिला तात्काळ रॉबर्ट वुड जॉनसन विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
प्रियकरावर संशय, अटक
आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, इमानीचा 35 वर्षीय प्रियकर डी. जॅक्सन स्मॉल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेपूर्वी दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात समोर आली असून, ही हिंसाचाराची घटना अचानक घडलेली नसावी, असा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तीन वर्षांच्या मुलाची आई होती इमानी
क्राउड फंडिंग वेबसाइट GoFundMe वर दिलेल्या माहितीनुसार, इमानीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरावर थेट हत्येचे गंभीर आरोप केले आहेत. विनाकारण आणि निर्दयपणे इमानीची हत्या करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
पोलिसांकडून आरोपीवर
- प्रथम श्रेणीतील हत्या,
- द्वितीय श्रेणीतील मुलाच्या भवितव्याला धोका निर्माण केल्याचे आरोप
असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
इमानी ही एका तीन वर्षीय मुलाची आई होती. हा मुलगा तिच्या प्रियकरासोबतच्या नात्यातून जन्माला आल्याचे सांगितले जात असले, तरी याबाबतची अधिकृत माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे.
तपास सुरू
या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पोलिसांकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे. या हत्येमागील नेमके कारण काय, याबाबत लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



