विद्यापीठात कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांचा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

अमरावती – (दि. 20/12/2025) : कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्ताने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गाडगे बाबा अध्यासन केंद्रात पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रभारी कुलसचिव तथा परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. तसेच मुख्य प्रवेशद्वारा समोरील श्री संत गाडगे बाबांच्या संदेशशिल्पाला पुष्पार्पण करुन अभिवादन करण्यात आले.
पुण्यतिथी कार्यक्रमाला माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, वित्त व लेखा अधिकारी सीए. पुष्कर देशपांडे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, संगणक केंद्र प्रमुख डॉ. सुहास पाचपांडे, श्री संत गाडगे बाबा अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. दिलीप काळे, महानुभाव अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. महंत सोनपेठकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधाराचे समन्वयक डॉ. रत्नशील खोब्राागडे, प्रा.डॉ. संयोगिता देशमुख, प्रा.डॉ. प्रणव कोलते, उपकुलसचिव श्री मंगेश वरखेडे, डॉ. सुलभा पाटील, सौ. मोनाली तोटे पाटील, सौ. मिनल मालधुरे, डॉ. साक्षी ठाकूर, उपअभियंता (विद्युत) श्री राजेश एडले, उद्यान अधीक्षक श्री अनिल घोम, जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर तसेच विद्यापीठातील अधिकारी, शिक्षक व कर्मचारी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन व कर्मयोगी श्री संत गाडगे बाबा यांच्याबद्दल माहिती श्री संत गाडगे बाबा अध्यासन केंद्रप्रमुख डॉ. दिलीप काळे यांनी केले.



