AmravatiLatest NewsMaharashtraMaharashtra Politicspolitics

अमरावती महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ

उबाठा गटाला धक्का; माजी विरोधी पक्षनेते प्रशांत वानखडे यांचा ९०० समर्थकांसह युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश

अमरावती, दि. — :
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाला मोठा धक्का देत, सलग पाच वेळा नगरसेवक, माजी विरोधी पक्षनेते तसेच जिल्हाप्रमुख असलेले प्रशांत वानखडे यांनी सुमारे ९०० समर्थकांसह युवा स्वाभिमान पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे.

हा भव्य प्रवेश सोहळा युवा स्वाभिमान पार्टीचे अध्यक्ष आमदार रवि राणा यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार रवि राणा यांनी प्रशांत वानखडे व त्यांच्या समर्थकांचे पुष्पगुच्छ देऊन आणि पक्षाचा दुपट्टा घालून सन्मानपूर्वक स्वागत केले.

प्रवेशानंतर बोलताना प्रशांत वानखडे म्हणाले की, “आमदार रवि राणा यांनी अमरावतीसाठी केलेले विकासकार्य, त्यांची ठाम भूमिका आणि लोकाभिमुख विचारधारा यामुळेच आम्ही युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”
याचवेळी त्यांनी उबाठा गटावर टीका करत, “पक्ष सध्या नेतृत्वहीन असून कार्यकर्त्यांमध्ये दिशाहीनता निर्माण झाली आहे,” असा थेट आरोप केला.

दरम्यान, आमदार रवि राणा यांनी सांगितले की, “प्रशांत वानखडे यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची ताकद युवा स्वाभिमान पार्टीला आगामी महानगरपालिका निवडणुकीत निश्चितच बळ देईल.”

या सामूहिक प्रवेशामुळे अमरावतीच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी महापालिका निवडणूक अधिक चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button