AmravatiLatest NewsSports

राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा 2025-26 चे अमरावती येथे आयोजन

अमरावती, दि. 16 डिसेंबर: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुले व मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा सन २०२५-२६ चे आयोजन दि. १७ ते २० डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुलाच्या खेलो इंडिया आर्चरी आंतरराष्ट्रीय रेंजवर होणार असून, राज्यातील ८ महसूल विभाग आणि १ क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथील एकूण ९ विभागांतील खेळाडू सहभागी होतील. अंदाजे ४८५ खेळाडू, संघव्यवस्थापक, प्रशिक्षक आणि निवड समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन समारंभात जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, राज्य ऑलिम्पिक संघटनेचे उपाध्यक्ष अॅड. प्रशांत देशपांडे, राज्य धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर उपस्थित राहतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्चरी खेळाडू तुषार शेळके, मानव जाधव, कुमकुम मोहोड, यशदिप भोगे, मधुरा धामणगांवकर, पुर्वशा शेंडे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

निवड समिती इंडियन, कंपाऊंड आणि रिकर्व्ह या क्रीडा प्रकाराचे निरीक्षण करून महाराष्ट्र राज्याच्या १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या संघाची निवड करेल. निवड झालेल्या संघाची घोषणा दि. २० डिसेंबर रोजी होईल. या संघाचे खेळाडू झारखंड आणि मणिपूर येथे होणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील.

प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडूंना आकर्षक मेडल्स व प्राविण्य प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत, तर सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धा सहभाग प्रमाणपत्रे वितरित केली जातील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button