AmravatiCrime NewsLatest News

अमरावती गुन्हे शाखेची मोठी कारवाई!प्रतिबंधित गुटखा–तंबाखूची लाखोंची खेप जप्त | गाडी जप्त, चालक अटक

अमरावती – अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी टाटा इंडिगो गाडीतून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधी तंबाखू जप्त केली आहे. यामध्ये एकूण ₹7,60,160 इतक्या किमतीचा मुद्देमाल आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कडू यांच्या नेतृत्वाखाली पथक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नियमित पॅट्रोलिंग करत होते. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, टाटा इंडिगो गाडी अवैध गुटखा व तंबाखू घेऊन अमरावतीकडे येत आहे. ही माहिती खात्रीलायक ठरल्यावर गुन्हे शाखेने तात्काळ अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी गजानन गोरे आणि पंचांशी संपर्क साधून सापळा रचला.

गाडी थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता, मस्तानी निळे पॅकेट – 3600, मस्तानी गोल्डन – 208 पॅकेट, गुटखा नजर ब्रँड – 132 पॅकेट असा मुद्देमाल आढळला. वाहनचालकाने स्वतःचे नाव राजू शाह कदीर शाह (वय 50, रा. गधेगाटपुरा, मोर्शी, जि. अमरावती) सांगितले.

गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेतले आणि संपूर्ण माल जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे बडनेरा आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button