AmravatiLatest News
श्री रा.सु. (दादासाहेब) गवई स्मारकामध्ये महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

अमरावती : शहरातील मार्डी रोडवरील श्री रा.सु. (दादासाहेब) गवई स्मारकामध्ये महापरिनिर्वाण दिनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. स्मारकाचे संपदा व्यवस्थापक श्री धम्मदीप गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी अजिंक्य ढोले श्री किशोर निंभोरकर, संदीप खरबडे, संदीप पाटणकर, देवांशू इंगोले, अनिल भोसले, स्वप्नील राऊत आदी उपस्थित होते.



