Amaravti GraminAmravatiLatest News

अमरावती ZP चा “गोळी इंग्लिशची” उपक्रम लोकप्रिय; ग्रामीण भागात बालकांना इंग्रजीची गोडी लागतेय

अमरावती: जिल्हा परिषद अमरावतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती संजीता महापात्रा यांच्या कल्पनेतून साकार झालेला “गोळी इंग्लिशची” हा अभिनव उपक्रम सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत आहे. विशेषतः धारणी तालुक्यात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण भागातील बालकांमध्ये इंग्रजी शिकण्याबाबत सकारात्मक बदल जाणवत आहेत.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश— गावागावातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या ३ ते ६ वर्षांच्या मुलांना इंग्रजी भाषेची ओळख आनंददायी पद्धतीने करून देणे हा आहे. या उपक्रमासाठी बारावी पास आणि पदवीधर अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.

प्रशिक्षणानंतर सेविका मुलांना खेळ, उपक्रम, गाणी आणि अ‍ॅक्टिव्हिटी-बेस्ड टीचिंगच्या माध्यमातून एबीसीडी, फळे, प्राणी, वस्तू, भाज्या, फुले आणि विविध आकारांची इंग्रजी नावे शिकवत आहेत. शिक्षणाचा हा नविन ढंग मुलांना अतिशय रुचकर वाटत असून वर्गातील वातावरणही अधिक उत्साही झाले आहे.

धारणी तालुक्यात उपक्रमाची अंमलबजावणी वेगाने होत असून, सेविका स्वतः नवीन पद्धती शिकून मुलांपर्यंत पोचवत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील बालकांसाठी पूर्व प्राथमिक इंग्रजी शिक्षण अधिक सोपे, आधुनिक आणि आनंददायी झाले आहे.

पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून, मुलांच्या शिकण्यात होणाऱ्या बदलांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button