भातकुली पोलिसांची मोठी कारवाई; साई योगी हॉटेलवर छापा, ७ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

भातकुली पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत मोठी कारवाई करत साई योगी हॉटेल व रेस्टॉरंटवर छापेमारी करून मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२ डिसेंबर रोजी भातकुली पोलिसांना माहिती मिळाली की भातकुली–दर्यापूर रोडवरील साई योगी हॉटेलमध्ये अवैधरित्या देशी व विदेशी दारूचा साठा ठेवण्यात येत आहे. माहितीची खात्री करून पंचासह पोलिसांनी ठिकाणी छापा टाकला. हॉटेलची आणि हॉटेल मालकाच्या महिंद्रा TUV 300 (MH 14 EY 6371) वाहनाची झडती घेतली असता मोठा दारूसाठा आढळला.
जप्त मालामध्ये —
- २२ बॉबी संत्रा कंपनीची देशी दारू (९० मिली) – ५२ नग
- रॉयल स्ट्रॉंग विदेशी दारू (१८० मिली) – ७ नग
- रॉयल स्ट्रॉंग विदेशी दारू (९० मिली) – १५ नग
- मॅकडॉल नं. १ विदेशी दारू (१८० मिली) – ३ नग
- मॅकडॉल नं. १ विदेशी दारू (९० मिली) – ९ नग
- रॉयल चॅलेंज विदेशी दारू (१८० मिली) – २ नग
- महिंद्रा TUV 300 वाहन
एकूण सुमारे ७ लाख ९ हजार ५०० रुपयांचा अवैध माल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई), 77 (अ), 83 अंतर्गत तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अशी:
- बाळासाहेब विष्णुपंत तळोकार (वय ५७), भातकुली
- आशिष ज्ञानेश्वर सोनटक्के (वय ४२), नागपूर
- कालिदास उर्फ सोनू विठ्ठल रंगे (वय ३३), भातकुली
ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास भातकुली पोलीस करत आहेत.



