Amaravti GraminCrime NewsLatest News

उर्दू नगरपरिषद शाळेत 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; 56 वर्षीय संशयित राजू मुल्ला पोलिसांच्या ताब्यात

चांदूर बाजार येथे उर्दू नगरपरिषद शाळेत शिकणाऱ्या 6 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू मुल्ला झहरुद्दीन मुल्ला (वय 56) याला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

घटना दुपारी दोनच्या सुमारास घडल्याचे समजते. शाळेतून घरी परतल्यानंतर पीडित चिमुरडीने ही माहिती आपल्या पालकांना दिली. त्यानंतर पालकांनी शाळेतील CCTV कॅमेऱ्यांची पाहणी केली असता संशयिताची हालचाल आढळल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रार मिळताच चांदूर बाजार पोलिसांनी त्वरीत कारवाई करून संशयिताला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

घटनेमुळे परिसरात संताप आणि खळबळ उडाली असून शाळा परिसरातील सुरक्षेविषयी पालकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांनी संबंधित पुरावे जपत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button