Amaravti GraminelectionLatest Newspolitics
अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत ७०% मतदान; मतमोजणी २१ डिसेंबरला

अचलपूर : अचलपूर नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण ७० टक्के मतदान झाले आहे. २ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता सुरू झालेली मतदान प्रक्रिया रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होती. अचलपूर नगरपालिका क्षेत्रातील २१ वार्डांमध्ये शांततेत मतदान पूर्ण झाले.
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजप, काँग्रेस आणि एमआयएम समर्थित उमेदवारांमध्ये मुख्य लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मतदान संपल्यानंतर सर्व EVM मशीन कल्याण मंडपातील स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितपणे सील करण्यात आली आहेत. स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
अचलपूर नगरपालिकेची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.



