AmravatiEducation NewsLatest News

एम. कॉम. विद्यार्थ्यांसाठी संशोधन प्रकल्प तयारी कार्यशाळेचे आयोजन

खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो. से. विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागात “How to Prepare a Research Project: Implementing a Business Idea” या विषयावर एम. कॉम. विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन दि. 01 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. डी. एन. व्यास होते. त्यांनी प्रस्तावनेत संशोधन प्रकल्पाचे शैक्षणिक महत्त्व, अभ्यासक्रमाशी असलेले नाते आणि विद्यार्थ्यांनी विकसित करावयाची संशोधन वृत्ती याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर कार्यशाळेचे मुख्य प्रास्ताविक डॉ. एम. एस. गायकवाड यांनी सादर केले. त्यांनी “संशोधन प्रकल्प कसा तयार करावा?”, “व्यावसायिक कल्पना संशोधनातून प्रत्यक्षात कशी आणावी?” याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच संशोधनाच्या प्रत्येक टप्प्याचे व्यावहारिक स्पष्टीकरण पॉवर पॉईंट प्रस्तुतीकरणाच्या माध्यमातून केले. प्रा. वैष्णवी साहू यांनी संशोधन प्रकल्पाचे शैक्षणिक व व्यावसायिक जगतातील वाढते महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी संशोधनाद्वारे विश्लेषण क्षमता, समस्या सोडवण्याचे कौशल्य व व्यवसायिक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अर्चना पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. रुचिका करंजकर यांनी केले. या कार्यशाळेला एम. कॉम. चे सर्व विद्यार्थी तसेच विभागातील प्राध्यापक उत्साहाने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन डॉ. डी. एन. व्यास यांच्या नेतृत्वाखाली झाले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button