Latest News
छत्रपती स्मारक प्रकरणात नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनात दाखल

मनसे नेते अमित ठाकरे नवी मुंबईत दाखल झाले असून, त्यांनी नेरूळ पोलिस स्टेशनला जाऊन गुन्ह्याशी संबंधित नोटीस स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनधिकृत उद्घाटन केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठाकरे यांना नोटीस बजावली असून, आज ते स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन ती स्वीकारणार आहेत. यावेळी मनसैनिकांनी नवी मुंबई परिसरात मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, या घटनेनंतर मनपा प्रशासनानेदेखील काही दिवसांत स्मारक सर्वांसाठी खुले केले होते. अमित ठाकरे आज पोलिस प्रक्रिया पूर्ण करून शिवरायांना अभिवादन करणार असल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे.



