Latest News

अमेरिका–व्हेनेझुएला तणाव शिगेला; लष्करी तैनातीमुळे युद्धाची शक्यता वाढली

अमेरिका आणि व्हेनेझुएलामधील तणाव चिघळत असून परिस्थिती युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने सुरक्षा इशारा दिल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी व्हेनेझुएलातील उड्डाणे तात्पुरती रद्द केली आहेत. स्पेनची इबेरिया, पोर्तुगालची टीएपी, चिलीची लाटम, कोलंबियाची एवियांका, ब्राझीलची जीओएल आणि त्रिनिदाद व टोबॅगोची कॅरेबियन एअरलाईन्स यांचा यात समावेश आहे.

लष्करी हालचाली अचानक वाढल्यामुळे फ्लाईटराडार२४ आणि मायकेटिया आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ऑनलाइन माहितीनुसार, काही विमानं उड्डाणाच्या तयारीत असूनही तत्काळ रद्द करण्यात आली. कोलंबियाच्या एव्हिएशन अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्या परिसरात वाढलेल्या लष्करी गतिविधींमुळे उड्डाणांना धोका निर्माण झाला आहे.

अमेरिकेने मागील काही महिन्यांमध्ये या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर युद्धसज्जता केली आहे. मोठे विमानवाहू युद्धनौका, आठ नेव्हल शिप्स आणि एफ-३५ लढाऊ विमाने तैनात करण्यात आली आहेत. रॉयटर्सच्या माहितीनुसार, अमेरिकेचे आगामी ऑपरेशन हे वेगवेगळ्या टप्प्यांत पुढे नेले जाऊ शकते आणि यामध्ये गुप्त मिशनचाही समावेश असू शकतो. तसेच व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना पदावरून हटवण्याच्या पर्यायावरही अमेरिकी प्रशासन विचार करत असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजनैतिक संघर्षामुळे आता दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button