Amaravti GraminAmravatiamravatinewscitynewsLatest News

अमरावती | राजकीय तापलेलं वातावरण

अमरावतीच्या राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांची ठिणगी पेटली आहे. भाजप नेते किरण पातूरकर यांनी काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप करत तीव्र टीका केली आहे.

पातूरकर यांनी म्हटले आहे की,
मुख्यमंत्र्यांवर वक्तव्य करून केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न यशोमती ठाकूर करीत असून, तोच त्यांचा राजकीय अजेंडा आहे. त्यांनी थेट आरोप केला की, पक्षश्रेष्ठींच्या नजरेत येण्यासाठी काँग्रेसकडून ‘केविलवाणी धडपड’ सुरू आहे.

इतकंच नाही तर पातूरकर यांनी काँग्रेस पक्षासह यशोमती ठाकूर यांना ‘बावसाळलेलं’ असे संबोधत जोरदार टीका केली.

तसेच, बिहारच्या अलीकडील निवडणूक निकालांपासून ते अमरावती महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपर्यंत जनतेचा झुकलेला कल भाजपकडे स्पष्टपणे दिसत असल्याने काँग्रेस बचावाच्या भूमिकेत गेली आहे, असा दावा पातूरकर यांनी केला.

या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button