नवोदय विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता समागमात ऐतिहासिक कामगिरी नवोदय विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता समागमात ऐतिहासिक कामगिरीव्हायोलिन वादन आणि 2-डी आर्ट प्रकारात देशात प्रथम क्रमांकनवोदय विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता समागमात ऐतिहासिक कामगिरी

पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती येथील विद्यार्थ्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे झालेल्या 24 व्या राष्ट्रीय एकता समागम-2025 मध्ये चमकदार कामगिरी करून जिल्ह्याचा मान वाढविला.
विद्यालयातील मास्टर वेदांत अथीलकर यांनी व्हायोलिन वादनात तर मास्टर हर्षल सोनोने यांनी 2-डी आर्ट प्रकारात देशात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच, समूह वादन (ऑर्केस्ट्रा) प्रकारात मास्तर दर्शन निकोडे, जीत खवले, अर्णव बोडखे आणि आरुष पाझरे यांनी उपविजेतेपद मिळविले.
या प्रसंगी नवोदय विद्यालय समिती, दिल्लीचे आयुक्त राजेश लखानी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. देशातील एकूण 661 नवोदय विद्यालयांमधून विभागीय, क्षेत्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध कला, संस्कृती व संगीत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी सर्व पातळ्यांवरील फेऱ्या यशस्वीरीत्या पार करत राष्ट्रीय स्तरावर विजय मिळविला.
महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादरा-नगर हवेली आणि दमण या पाच राज्यांचा समावेश असलेल्या पुणे संभागाला राष्ट्रीय स्पर्धेत एकूण सहा प्रथम क्रमांक मिळाले असून त्यापैकी अमरावती नवोदय विद्यालयाने दोन प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
पुणे विभागाच्या उपायुक्त श्रीमती मेरी मनी आणि सहउपायुक्त श्री. प्रेमकुमार यांनी विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, उपप्राचार्य एस. हिसवणकर, संगीत शिक्षक विनोद अथीलकर, कला शिक्षक एस. एन. मालवीय यांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हे यश शक्य झाल्याचे पालक व विद्यार्थ्यांनी सांगितले.



