अंशकालीन निदेशकांना ५ महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने संताप

अमरावती जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील उच्च प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये
बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांकरिता अंशकालीन निदेशक रुजू करण्यात आले आहेत.म शासनाच्या 5 जून 2025 च्या सुधारित धोरणानुसार या निदेशकांना 12 ते 18 हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे.
तथापि, मागील पाच महिन्यांपासून क्रीडा व कार्यानुभव विषयाच्या निदेशकांना एक रुपयादेखील मानधन मिळालेले नाही.
या विलंबामुळे त्यांची दिवाळी अक्षरशः अंधारात गेली आहे.
घरखर्च, प्रवासखर्च, आणि शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या अन्यायाविरोधात आवाज उठवत
अमरावती जिल्हा अंशकालीन निदेशक कृती समितीचे अध्यक्ष एजाज अहमद अब्दुल चाक यांच्या नेतृत्वाखाली
मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात तातडीने मानधन मिळून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अन्यथा, निदेशकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,
असा इशारा समितीने प्रशासनाला दिला आहे.
शिक्षण विभागाने तातडीने दखल घेऊन
या अंशकालीन निदेशकांना न्याय मिळवून द्यावा,
अशी मागणी शिक्षण क्षेत्रातूनही होत आहे.



