दगाबाजी करणाऱ्या सरकार ला धडा शिकवापक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे

लातूर दि. ५ (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांची फसवणूक करून वारंवार मतं घेतली पाहिजेत, मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीने मदत द्यायची नाही असा उद्देश सरकारचा दिसून आहे. त्यामुळेच ‘दगाबाज रे’ आंदोलन सुरू आहे. सरकार कडून मदत जाहीर करून फसवणूक केली जात आहे, सरकारने मदत फक्त जाहीर केली तरी आधार मिळत नाही. पूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन देऊन फसवण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही ‘दगाबाज रे’ आंदोलनासह असंख्य शेतकऱ्यांनी हक्कासाठी रस्त्यावर उतरले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी लढा उभारला असून सरकारकडून मदत मिळावी यासाठी ठिकठिकाणी दौरे करत आहेत.
औसा तालुक्यातील भुसणी येथील शेतकऱ्यांनी ठाकरे साहेबांच्या संवाद दौर्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी ठाकरे साहेबांनी ठाकरे यांच्या समोर गैरसोयीचा व तक्रारींचा पाढा वाचला.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विविध समस्यांबाबत मांडणी केली. शेतकऱ्यांनी वेळोवेळी शिक्षण फिस माफीचा प्रश्न मांडला. ठाकरे साहेबांनी सांगितले की, शेतकरी राजा जर सुखी समाधानी असेल तर आपण सर्व सुखी समाधानी आहोत.
सरकारने शेतकऱ्यांना शासन मदतीस पूर्णपणे उदासीनता दाखवली आहे. अशा सरकारला उलथून टाकले पाहिजे.
यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार कैलास पाटील, आमदार मिलिंद नार्वेकर माजी आ. दिनकर माने, जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी, बालाजी रेड्डी, नामदेव चाळक, जयश्री उटगे, दिनेश जावळे शिवसेनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



