Latest NewsMaharashtraNagpur

घरफोडी करणारे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

४ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फुलमती ले-आऊट परिसरात घरफोडीची घटना घडली होती. फिर्यादी कु. खुशी नितनवरे आपल्या कुटुंबासह अहमदाबाद येथे गेल्या असता, चोरट्यांनी त्यांच्या घराचे गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातून दोन लॅपटॉप आणि होंडा अॅक्टीवा असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. गुन्हेशाखा युनिट क्र. १ चे अधिकारी व अंमलदारांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे दोन आरोपींना ताब्यात घेतले, यात तुषार राजेश राऊत, वय १९ वर्षे, रा. श्रीकृपा नगर, बेसा-घोगली रोड, हुडकेश्वर आणि मारोती उर्फ अभिषेक राजकुमार भौतीक, वय २५ वर्षे, रा. शारदा नगर, वाठोडा ले-आऊट. चौकशीत आरोपींनी तिसरा साथीदार कार्तिक मानवटकर आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी एक लॅपटॉप, चोरी केलेली होंडा अॅक्टीवा आणि गुन्ह्यात वापरलेला डिओ मोपेड असा एकूण साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button