AmravatiEducation News

विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील स्पर्धक, कलावंत, साथीदार यांचीराज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य व अ.भा. आंतर विद्यापीठ कव्वाली स्पर्धेकरिता निवड

               संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील स्पर्धक, कलावंत व साथीदार यांची महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य – पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ युवा महोत्सव आणि अखिल भारतीय आंतर विद्यापीठ राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या चमूचा प्रशिक्षण वर्ग स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे 18, 19 ऑक्टोबर व 23 ऑक्टोबर ते 04 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
               सत्र 2025-26 मध्ये महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य-2025 महोत्सव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव येथे दि. 05 ते 09 नोव्हेंबर, 2025 दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. अखिल भारतीय विद्यापीठ संघ, नवी दिल्ली यांचेकडून पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ युवा महोत्सव तसेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कव्वाली स्पर्धेच्या आयोजनाच्या तारखा प्राप्त झाल्यानंतर त्याबाबत विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाव्दारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, असे विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी कळविले आहे. तसेच अधिक माहितीकरिता त्यांचेशी संपर्क साधावा, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button