AmravatiLatest News

गो. से. कनिष्ठ महाविद्यालयाचे  विद्यार्थी विभागीय व राज्य स्तरावर

गो. से. कनिष्ठ महाविद्यालयाचा चमकदार विजय – सनथ कवठेकर राज्यस्तरीय सेपॅक टकरासाठी निवड, सुजय हटकर व मंथन गावंडे विभागीय क्रिकेट संघात

खामगाव : दिनांक २८/८/२०२५  पासून आयोजित शालेय  क्रीडा स्पर्धेत गो.से. कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षी विविध स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून गो. से. कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ  U-19 सेपॅक टकरा  या स्पर्धेत विभागात उपविजेता ठरला असून  सनथ कवठेकर  याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे तसेच तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आपला कनिष्ठ महाविद्यालयीन संघाने विविध खेळा मध्ये दबदबा कायम ठेवला असून  यामध्ये प्रामुख्याने महाविद्यालयाचा संघ अथलेटिक्स मध्ये  जिल्हास्तरावर अनेक स्पर्धेत  प्रथम येऊन विभागाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये प्रामुख्याने ४०० मीटर रनिंग मध्ये (वाणिज्य मराठी) शाखेचा विद्यार्थी ओम गोविंदा खराटे हा जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. हॅमर थ्रो या स्पर्धेत (वाणिज्य मराठी) शाखेचा विद्यार्थी प्रतीक विजय खंडागळे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. १०० मिटर या स्पर्धेत (कला) शाखेची विद्यार्थिनी कु. ऋतुजा पुरुषोत्तम जोशी हिने  प्रथम क्रमांक पटकावला. ४०० मीटर हर्डल या स्पर्धेत अनुक्रमे ओम गोविंदा खराटे (प्रथम) आणि प्रतीक विजय खंडागळे (द्वितीय)  क्रमांक पटकावले. जुदो व वूशू या क्रीडा प्रकारात (कला) शाखेचे विद्यार्थिनी कु. सुपेक्षा रामधन खांजोडे हिने विभागावर कांस्य पदक मिळवले . क्रिकेट या स्पर्धेमध्ये सुजय हटकर आणि मंथन गावंडे या दोन्ही विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड झाली.  सपॅक टकरा या स्पर्धेमध्ये विठ्ठल भातखेडे ,प्रतीक बुरकुले ,सनथ कवठेकर ,अस्मित कळमकर ,देवेश अंबुस्कर यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक व विभागात उपविजेता ठरला.सदर यशाबद्दल विदर्भ प्रसारक मंडळ खामगाव चे अध्यक्ष आदरणीय डॉ. सुभाष बोबडे, उपाध्यक्ष आदरणीय प्रकाशजी तांबट तसेच सचिव डॉ. प्रशांत जी बोबडे व सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर सर, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. सुभाष वाघ यांनी  विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विभागीय व राज्य स्तरावर यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या सदर यशा प्रत विद्यार्थ्यांना पोचण्यासाठी क्रीडा शिक्षक  प्रा. डॉ. अनुराग बोबडे व  प्रा. धर्मराज मोगल ,प्रा योगेश टापरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे कनिष्ठ महाविद्यालयचे  प्रा. पीडी कायपेल्लीवार , प्रा.डॉ. अर्चना कुलकर्णी , प्रा अशोक  ढाले , प्रा. योगेश टापरे, प्रा. पल्लवी खरात , प्रा. श्वेता कदम , प्रा. आदर्श जगताप , प्रा. धीरज मोहिते, प्रा. सोनाली कोल्हे , प्रा. अरविंद गोमासे, प्रा. विनोद डाबरे, प्रा. गौरी पाटील, प्रा. डॉ. अनिता कामटेकर, प्रा. मधुरा शिंगाडे व शिक्षकेतर कर्मचारी श्री अभय मोहिते , श्री तांगडे श्री भिसे श्री वानखडे श्री सोनवणे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button