AmravatiLatest News

खासदार सौ.नवनित रवि राणा यांची गंगा सावित्री निवासस्थान शंकर नगर ते अंबा देवी – एकविरादेवी पर्यत पायी चालुन पदयात्रा केली महाआरती

आमदार रवि राणा व भाजपा नेत्या माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांची गंगा सावित्री निवासस्थान शंकर नगर ते अंबा देवी – एकविरादेवी पर्यत शेकडो भाविकांसह केली अनवानी पायी चालुन पदयात्रेव्दारे अंबा माता व एकविरा मातेच्या चरणी नतमस्तक होवुन केली महाआरती
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजुरांचे दु:ख व कष्ट दुर करण्याकरिता ताकद द्यावी याकरिता आ.रवि राणा व सौ.नवनित रवि राणा अंबा देवी व एकविरा देवीला केली प्रार्थना, भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमान पार्टीव्दारे संयुक्त महापदयात्रा
गंगा-सावित्री निवास – केडीया नगर – राजापेठ – कुथे स्टॉप – राजकमल – गांधी चौक अंबादेवी मंदिरापर्यत केली पदयात्रा- जागो जागी आ.रवि राणा व सौ.नवनित रवि राणा यांच्या सह महापदयात्रेत सहभागी शेकडो भाविकांचे केले स्वागत.

तसेच आत्महत्या ग्रस्त व अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकरी तसेच कष्टकरी कामगार, आदिवासी, बेरोजगार युवक-युवती, विद्यार्थी, व्यापारी, गृहीनी यांच्या जिवनामध्ये सुख-समृध्दीचे दिवस येण्याकरीता आई अंम्बेच्या चरणी व एकविरा मातेच्या चरणी आमदार रवि राणा व भाजपा नेत्या माजी खासदार सौ.नवनित रवि राणा घातले साकडे.
अमरावती – दरवर्षी प्रमाणे यंदाही नवरात्रीच्या पावन पर्वावर आमदार रवि राणा व भाजपा नेत्या माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांनी गंगा सावित्री
निवासस्थान शंकर नगर ते अंबा देवी – एकविरादेवी पर्यत शेकडो भाविकांसह अनवानी पायी चालुन पदयात्रेव्दारे अंबा माता व एकविरा मातेच्या चरणी नतमस्तक होवुन महाआरती केली.
त्या पदयात्रेमध्ये शेकडोच्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी होऊन गंगा सावित्री निवास येथुन केडीया नगर, राजापेठ, कुथे स्टॉप, राजकमल, गांधी चौक, अंबादेवी मंदिरापर्यत एकविरा माता व अंबा मातेचा जयघोष व गजर केला. यावेळी प्रथम अंबा मातेच्या मंदिरात जावुन दर्शन घेवुन महाआरती करण्यात आली. यानंतर एकविरा मातेच्या मंदिरात दर्शन व महाआरती करण्यात आली. यावेळी
अंबा मातेच्या व एकविरा मातेच्या चरणी नतमस्तक होवुन आत्महत्या ग्रस्त व अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकरी तसेच कष्टकरी कामगार, आदिवासी, बेरोजगार युवक-युवती, विद्यार्थी, व्यापारी, गृहीनी यांच्या जिवनामध्ये सुख-समृध्दीचे दिवस येण्याकरीता साकडे घातले.
तसेच यावेळी संस्थानच्या वतीने आमदार रवि राणा व भाजपा नेत्या माजी खासदार सौ.नवनित रवि राणा यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमान पार्टीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकत्यासह भाविक भक्त उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button