अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेकरिता विद्यापीठाचा महिला व पुरुष संघ घोषित

अमरावती – (दि. 30/09/2025) : गुरू काशी युनिव्र्हसिटी, सार्दुलगड रोड, तलवंडी साबो, भटिंडा (पंजाब) येथे 24 ते 31 ऑक्टोबर, 2025 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या (महिला व पुरुष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला असून, चमूंचा प्रशिक्षण वर्ग दि. 9 ते 18 ऑक्टोबर, 2025 दरम्यान डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे होणार आहे.
महिला संघ
महिला चमूंमध्ये जगदंबा महाविद्यालय, अचलपूरची कु. मानसी च-हाटे, विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगांव खंडे·ारची कु. श्रेया खंडार, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. अनन्या कुमारी, कु. मंडगबम इचांबी व कु. वंधना बंटी डी., प्रो. राम मेघे इन्स्टिट¬ुट ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड रिसर्च, बडनेराची कु. मोहिनी राठोड, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चिखलदराची कु. रिध्दी पोटे व कु. सिध्दी पोटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावतीची कु. गौरी खवले, प्रो. राजाभाऊ देशमुख महाविद्यालय, नांदगांव खंडे·ारची कु. साक्षी तोटे, श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीची कु. आस्था कबिर, बी.बी. आर्टस्, एन.बी. कॉमर्स अॅन्ड बी.बी.सायन्स कॉलेज, दिग्रसची कु. प्रियंका राठोड हिचा समावेश आहे.
पुरुष संघ
पुरुष चमूंमध्ये विनायक विज्ञान महाविद्यालय, नांदगांव खंडे·ारचा सुमित गुरनुले, हर्षल दैत, हिमांशू चरडे, प्रसाद चंदाने व नयन कापडे, नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंतचा अनिरुध्द खंडारे, सिताबाई कला व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा राज भारसाकळे, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा वेदांत अजबे व अथर्व मोरे, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय, अमरावतीचा स्वास्तिक सोनोने, बी.एस. पटेल महाविद्यालय, पिंपळगांव काळेचा शिवा अडवे, जी.एन.ए. महाविद्यालय, बार्शीटाकळीचा सुरज खानझोडे, बी.एस.पाटील महाविद्यालय, परतवाडाचा श्रेयस अवघड व श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा आयुष वानखडे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे.



