Accident NewsAchalpurAmravatiAmravatiLatest NewsMaharashtra

अमरावती-परतवाडा मार्गावर भीषण अपघात; रन बाबा कार दुर्घटनाग्रस्त, दोन जण गंभीर जखमी

परतवाडा वरून अमरावतीकडे येणारी रन बाबा ही खासगी कार भुगाव गावाजवळ भीषण अपघातग्रस्त झाली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ही दुर्घटना घडली, अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली.

अपघातात कारमध्ये असलेले चालक आणि एक अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले असून, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात इतका जबरदस्त होता की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला आहे. या मार्गावर वाहतुकीचा वेग आणि वळणांची संख्या लक्षात घेता अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने, अमरावती–परतवाडा मार्ग हा जीवघेणा बनत चालल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे.

अपघाताबाबत अधिक तपास स्थानिक पोलीस करीत आहेत

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button