Uncategorized

स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या जयंती उत्सव सप्ताहाचे आयोजन

खामगाव (प्रतिनिधी) स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित गो. से. विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर पर्यंत खामगाव शहराचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष, माजी खासदार खामगाव, माजी अध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव, खामगाव रत्न स्व. ऍड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ जयंती सप्ताहाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

18 सप्टेंबर रोजी ह्या स्मृती सप्ताहाचा शुभारंभ होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. डॉ. सुभाषजी बोबडे ( अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), तथा उद्घाटक म्हणून मा. राजेश राजोरे (संपादक देशोन्नती) लाभणार आहेत. तसेच मा. प्रकाशजी तांबट (उपाध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव),  मा. डॉ. प्रशांत जी बोबडे (सचिव, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. अजिंक्यदादा बोबडे (कोषाध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), सौ. श्रद्धा ताई प्रशांत बोबडे, मा. नीताताई बोबडे, व शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर, उपप्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे, व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहे. याच दिवशी महाविद्यालय परिसरामध्ये दुपारी एक वाजता वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मा. डॉ. सुभाष जी बोबडे, मा. राजेश राजोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता अवेअरनेस प्रोग्राम ऑन गेट अँड जेम आयोजन स्व. शंकररावजी बोबडे सभागृहामध्ये करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजता दुर्मिळ विदेशी नाणे व चलन प्रदर्शनी सेंटर ऑफ एक्सलन्स हॉल येथे करण्यात आली आहे. तसेच सकाळी दहा पासून कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे.

शनिवार 20 सप्टेंबर रोजी विविध क्रीडा स्पर्धा, बॅडमिंटन, स्विमिंग, बुद्धिबळ स्पर्धा, इंडोर स्टेडियम व जलतरण तलाव येथे घेण्यात येणार आहे.

सोमवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता भौतिक शास्त्र विभाग प्रयोगशाळेमध्ये Innovate-2025 (Exhibition of Innovative Ideas Project)  एक्झिबिशन चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी दहा वाजता विद्यापीठ स्तरीय दोन दिवसीय वर्कशॉप रिसर्च मेथोडोलॉजी स्मार्ट क्लासरूम येथे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार 23 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता राज्यस्तरीय अंतर महाविद्यालय वादविवाद स्पर्धा विषय “लोकशाहीतील आंदोलन तारक की मारक? या विषयावर स्व. शंकररावजी बोबडे सभागृह मध्ये आयोजन करण्यात आले आहे. त्याच दिवशी सकाळी दहा वाजता गर्ल्स कॉमन रूम येथे रांगोळी, मेहंदी, पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 09  वाजता भौतिकशास्त्र विभागामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. यानंतर स्व. ॲड. शंकररावजी उपाख्य भाऊसाहेब बोबडे स्मृती सप्ताहा चे समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम बोबडे सभागृह मध्ये होणार आहे. अध्यक्ष म्हणून मा. अजिंक्यदादा बोबडे (कोषाध्यक्ष विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), तथा प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. प्रशांतजी शेळके मुख्याधिकारी न. प. खामगाव, लाभणार आहे.

स्मृति सप्ताहाचे मार्गदर्शक मा. डॉ. सुभाष रावजी बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांच्या बहुमुल्य मार्गदर्शनाने हा स्मृती सप्ताह साजरा करण्याचे ठरले आहे. तरी या स्मृति सप्ता मध्ये पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर,   प्रा. डॉ. देवेंद्र व्यास (समन्वयक जयंती उत्सव), यांनी केले आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button