Latest News

महागाईचा स्फोट! अमेरिका फर्स्ट धोरणाची किंमत ट्रम्प यांनाच चुकवावी लागतेय?

वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘America First’ ही धोरणं आता उलटी ठरत असल्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहेत. स्थानिक नागरिकांना प्राधान्य देणाऱ्या निर्णयांमुळे सुरुवातीला देशहिताचे भासलेलं चित्र आता महागाईच्या आगीत होरपळू लागले आहे.

ग्रॉसरीच्या किमती झपाट्याने वाढल्या

ऑगस्ट २०२५ मध्ये अमेरिका देशातील ग्रॉसरी किमतींमध्ये 0.6% वाढ झाली आहे.

सध्या 1 डझन अंडी : 3.59 डॉलर (~₹300)

1 पाऊंड बटाटा : 1 डॉलर (~₹84)

3 लीटर दूध : 4.17 डॉलर (~₹350)

ब्रेड : 1.84 डॉलर (~₹155)

बीफ, चिकन आणि इतर खाद्यपदार्थांच्या किमतींमध्येही 7 ते 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.

USDA च्या अंदाजानुसार २०२५ मध्ये अन्नधान्याच्या किमती 3.3% पर्यंत वाढू शकतात. यामुळे सामान्य अमेरिकी नागरिकांचे बजेट कोलमडण्याच्या मार्गावर आहे.

महागाई दर पुन्हा चढा

ऑगस्ट २०२५ मध्ये महागाई दर 2.9% वर पोहोचला आहे, जो जुलैतील 2.7% च्या तुलनेत अधिक आहे.

ही वाढ जानेवारी २०२५ नंतरची सर्वात मोठी नोंदवण्यात आली आहे.

ट्रम्प धोरणांचा उलटा परिणाम?

ट्रम्प प्रशासनाने चीन, मेक्सिको, कॅनडा यांसारख्या देशांवर लावलेले 10% ते 25% टॅरिफ आता महागाईला कारणीभूत ठरत आहेत. आयात महाग झाल्यामुळे कंपन्यांनी हा भार थेट ग्राहकांवर टाकला, आणि त्यामुळे…

वस्तू महाग

उत्पादन खर्च वाढला

सेवा क्षेत्रात मंदी

डेटा सेंटर्स आणि वीज दरात वाढ

या सगळ्यांचा थेट परिणाम आता अमेरिकन किचनवर दिसू लागला आहे.

नागरिकांची चिंता वाढली

USDA आणि इतर सर्वेक्षणांनुसार, जवळपास 90% अमेरिकी नागरिक वाढत्या ग्रॉसरी किमतींमुळे त्रस्त आहेत.
कमी उत्पन्न असलेली कुटुंबं महागाईमुळे सर्वाधिक प्रभावित आहेत – कारण त्यांचा अन्नावर खर्च होणारा हिस्सा तुलनेत अधिक आहे.

पुढे काय?

निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्याचा फटका डोनाल्ड ट्रम्प यांना राजकीयदृष्ट्या बसण्याची शक्यता आहे. नागरिक महागाईचा दोष थेट सरकारच्या धोरणांवर देत आहेत.
आता ट्रम्प यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांसाठी महागाई आटोक्यात आणणं ही सर्वोच्च प्राधान्याची बाब बनली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button