AmravatiamravatinewsCity CrimeLatest News

अमरावतीत गणेश विसर्जनादरम्यान तरुणावर चाकू हल्ला

अमरावतीतील हमालपुरा येथे गणेश विसर्जनाचा दिवस अचानक तणावपूर्ण झाला. बालवीर गणेशोत्सव मंडळ आणि तानाजी गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन सुरू असताना जुन्या वैमनस्यातून हा वाद पेटला. सोनू आगाशे, पप्पू कुबडे आणि त्यांच्या एका साथीदाराने सांकेत जगताप या तरुणावर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे आणि डीसीपी शाम घुगे तात्काळ मोठा पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. हल्लेखोर आरोपी अद्याप फरार असून, राजापेठ पोलीस स्टेशन त्यांचा कसून शोध घेत आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार कुलट करत आहेत. हल्ल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत तानाजी मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून पोलिसांनी विसर्जन शांततेत पार पाडले.

सध्या हमालपुरा परिसरात जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस गंभीरपणे लक्ष ठेवून आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button