गडगा नदीतील दुर्दैवी घटना; गणेश विसर्जनाच्या आनंदात तरुणाचा मृत्यू

गडगा नदीकाठचा गणेश विसर्जनाचा उत्साह यंदा एका दुर्दैवी घटनेने मलीन झाला. अनिल गणेश माकोडे (वय ३०, रा. कुसुमकोट बुद्रुक) हा तरुण विसर्जनासाठी नदीकाठी गेला असताना अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांनी अनिल सुखरूप परत यावा, यासाठी देवाकडे प्रार्थना केली.
यानंतर जिल्हा शोध व बचाव पथक (DDRF), आपत्ती मित्र आणि स्थानिक तरुणांनी दोन दिवस अखंड प्रयत्न करून शोधकार्य सुरू ठेवलं. अखेर त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आणि अनिलचा मृतदेह नदीपात्रातून सापडला.
या शोधमोहीमेत देवानंद भुजाडे, विशाल निमकर, अर्जुन सुंदरडे, महेश मांदाळे, दीपक चिल्लोरकर, सुरेश पालवे, नागेश बेठेकर आणि साजन तारेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ही घटना गावकऱ्यांना हळहळ लावून गेली असून, आनंदाच्या क्षणी घडलेले हे दुःख सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरले आहे.



