सर्वसामान्य करदात्यांना मोदी सरकारकडून सर्वात मोठी सूट! आता Income Tax भरताना…

सोमवारी लोकसभेत सादर केलेल्या नव्या ‘आयकर विधेयक 2025’ मध्ये सामान्य करदात्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे.
सोमवारी लोकसभेत कोणती विधेयकं सादर झाली?
सोमवारी लोकसभेत ‘आयकर (क्रमांक 2) विधेयक -2025’ आणि ‘कर कायदे (सुधारणा) विधेयक 2025’ ही दोन्ही विधेयके चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. ‘आयकर विधेयक 2025’ हे विधेयक जुन्या 1961 च्या कायद्याची जागा घेणार असून, याचा उद्देश करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक करण्याचा आहे. सरकारने सिलेक्ट कमिटीच्या जवळपास सर्व शिफारशींचा यात समावेश केला आहे.
285 शिफारशींचा स्वीकार
भाजपचे लोकसभा सदस्य बैजयंत पांडा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ‘आयकर (क्रमांक 2) विधेयक-2025‘ बाबत 4584 पानांचा अहवाल सादर केला होता. या अहवालात सांगितलेल्या जवळपास 285 शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत. याशिवाय कायद्यातील अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी काही हितधारकांनीही बदल सुचवले होते.
जुन्या कायद्यात सुधारणा.
‘कर कायदे (सुधारणा) विधेयक’ हे आयकर कायदा-1961 आणि वित्त विधेयक-2025 मध्ये सुधारणा करेल. विधेयकाचा मुख्य उद्देश युपीएस पेन्शना सदस्यांना कर सवलत देणे हा आहे. आयकर चौकशी प्रकरणांशी संबंधित ‘ब्लॉक असेसमेंट’च्या योजनेतही बदल केले आहेत. तसेच, सौदी अरेबियाच्या सार्वजनिक गुंतवणूक निींना थेट कर लाभाची तरतूदही केली आहे.
टॅक्स स्लॅबमध्ये बदल
नव्या विधेयकात टॅक्स सूटची मर्यादा 7 लाख रुपयांवरून 12 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे मध्यमवर्गीयांच्या हातात अधिक पैसा शिल्लक राहील. यामुळे खर्च, बचत आणि गुंतवणूक वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारला असा विश्वास आहे की हा नवा कायदा पारदर्शक, सोपा आणि लोकाभिमुख असल्याने कर भरणा प्रक्रियेतील अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील.
- सोमवारी लोकसभेत कोणती विधेयके सादर झाली?
सोमवारी लोकसभेत ‘आयकर (क्रमांक 2) विधेयक – 2025’ आणि ‘कर कायदे (सुधारणा) विधेयक 2025’ ही दोन विधेयके सादर झाली आणि ती चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. - आयकर (क्रमांक 2) विधेयक – 2025′ चा मुख्य उद्देश काय आहे?
हे विधेयक 1961 च्या जुन्या आयकर कायद्याची जागा घेईल. याचा मुख्य उद्देश करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक बनवणे आहे. - नव्या आयकर विधेयकात सामान्य करदात्यांसाठी कोणती महत्त्वाची तरतूद आहे?
नव्या तरतुदीनुसार, उशिराने आयकर रिटर्न (आयटीआर) भरणाऱ्यांनाही आता टॅक्स रिफंड मिळणार आहे, ज्यामुळे उशिरा आयटीआर भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



