Education NewsLatest News

प्रत्येक शेअरवर गुंतवणूकदारांना मिळणार 50 रुपये Dividend, रेकॉर्ड तारीख 13 ऑगस्ट

अनेक कंपन्या आपल्या भागधारकांना लाभांशाच्या रुपात अतिरिक्त कमाईची संधी देतात. लाभांश म्हणजे कंपनीच्या नफ्यातील हिस्सा जो कंपनी तिच्या भागधारकांना देते. शेअर्सच्या निश्चित मूल्याच्या आधारावर लाभांश दिला जातो. भागधारकाला त्याच्या शेअरच्या प्रमाणात लाभांश मिळतो.


मुंबई :
एमपीएस लिमिटेडच्या शेअरधारकांना २०२५ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ५० रुपये अंतिम लाभांश मिळणार आहे. MPS Ltd dividend ची रेकॉर्ड तारीख १३ ऑगस्ट २०२५ आहे. ज्या शेअरधारकांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणी किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये या तारखेपर्यंत शेअर्सचे लाभार्थी म्हणून असतील त्यांनाच लाभांश मिळेल.
लाभांश इतिहास

यापूर्वी MPS Ltd dividend ने २०२५ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ३३ रुपये अंतरिम लाभांश दिला होता. २०२४ या आर्थिक वर्षासाठी शेअरधारकांना ३० रुपये अंतरिम लाभांश आणि प्रति शेअर ४५ रुपये अंतिम लाभांश मिळाला.

मार्केट कॅप
एमपीएस ही बी२बी लर्निंग आणि प्लॅटफॉर्म सोल्यूशन्स कंपनी आहे. एमपीएस शेअरचे दर्शनी मूल्य १० रुपये आहे. ७ ऑगस्ट रोजी बीएसईवर हा शेअर २३०४.०५ रुपयांवर बंद झाला. तर ८ ऑगस्ट रोजी शेअर्स घसरून २,२६२ रुपयांवर आला आहे. कंपनीचे मार्केट कॅप ३९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

शेअर्सचा परतावा
एमपीएस लिमिटेड शेअर्सने गुंतवणूकदारांना २ वर्षात २३४ टक्के परतावा दिला आहे. शेअर्सची एका महिन्यात किंमत १४ टक्क्यांनी घसरली आहे. जून २०२५ अखेर प्रमोटर्सकडे कंपनीत ६८.३४ टक्के हिस्सा होता.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button