Accident NewsLatest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळमध्ये ट्रक-दुचाकीचा भीषण अपघात: एक ठार, दोघे जखमी

यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यामध्ये ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या एका भीषण अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मुकुटबन मार्गावरील चेंडकापूरजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल संजय गागरे (वय २५) हा तरुण आपल्या दुचाकीवरून वणीहून मुकुटबनकडे जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या सिमेंटच्या भरलेल्या ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रफुल गागरे याचा जागीच मृत्यू झाला.

त्याच्यासोबत दुचाकीवर असलेले सुजल भोयर आणि आंचल भोयर हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र शिरपूर पोलिसांनी त्याला शोधून अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button