मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षणाची सुवर्णसंधी -विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागात प्रवेश प्रक्रिया सुरू

अमरावती : मराठी भाषेचे व्यासंगी अभ्यासक घडवणा-या आणि साहित्य, भाषाविज्ञान, लोकसंस्कृती तसेच संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करणा-या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाने गेल्या तीन दशकांमध्ये विविध सामाजिक-सांस्कृतिक संदर्भातील साहित्यिक अभ्यासास चालना दिली असून, आज सदर विभाग एक सशक्त विचारपीठ म्हणून कार्यरत आहे. पदव्यत्तर मराठी अभ्यासक्रमामध्ये विद्याथ्र्यांचा केवळ परीक्षाभिमुख अभ्यास न होता, त्यांचा वैचारिक, सर्जनशील आणि सामाजिक जाणिवांनी समृध्द होणारा अभ्यासक्रम राबविण्यात येतो. त्यामुळेच येथे तयार झालेले विद्यार्थी हे राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक, संपादक, अनुवादक, पत्रकार, अभ्यासक, प्रशासकीय अधिकारी अशा विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. विभागात अनुभवी आणि अभ्यासू प्राध्यापक कार्यरत आहेत. विद्याथ्र्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, चर्चासत्रे, प्रास्ताविक सादरीकरण, समूह चर्चा, परिसंवाद, साहित्यवाचन कार्यक्रम, कवी संमेलने, साहित्यिक कार्यशाळा अशा अऩेक कृतिशील पध्दतीच्या माध्यमातून विद्याथ्र्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यात विभाग यशस्वी ठरला आहे.
प्रवेशासाठी आवश्यक पात्रता, सर्व शाखांच्या विद्याथ्र्यांना संधी
मराठी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्याथ्र्यांना अर्ज करता येणार आहे. त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, कृषी, व्यवस्थापन अशा विविध पार्·ाभूमीचे विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतात.
विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे यांच्या नेतृत्वात विभागाने संशोधनवृत्तीला चालना देणारे परिसंवाद, राष्ट्रीय कार्यशाळा, विशेष व्याख्याने यांचे सातत्याने आयोजन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पात्रता परीक्षा व राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण करुन विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये अध्यापनासाठी आपली स्थाने निर्माण केली आहेत.
प्रवेश प्रक्रिया कशी कराल?
विद्याथ्र्यांनी https://sgbauadm.samarth.edu.in/index.php या संकेतस्थळावर जावून ऑनलाईऩ अर्ज भरावा. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे दहावी व बारावीचे गुणपत्रक, बोर्ड सर्टीफिकेट, पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स), पासपोर्ट साईज फोटो, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) व अन्य आवश्यक कागदपत्रे लागतील. याबाबत अधिक माहितीसाठी अभिजित इंगळे मो. 8421958279, सारिका वनवे मो. 9657971643, मनीष तायडे मो. 8007189801 यावर संपर्क साधावा.
मराठी विषयात करिअर घडवू पाहणा-या, सर्जनशील आणि अभ्यासू विद्याथ्र्यांसाठी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा पदव्युत्तर मराठी विभाग हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. अभ्यास, संशोधन, लेखन आणि सामाजिक जाणिवा या सर्वांचे एकत्रित रुप असलेली ही शैक्षणिक संधी विद्याथ्र्यांच्या भविष्याच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकते. इच्छूकांनी आजच अर्ज करुन या प्रवासाची सुरुवात करावी, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे यांनी केले आहे.



