AmravatiLatest News

विद्यापीठातर्फे विद्यार्थी विकास अधिकारी व समान संधी कक्ष समन्वयकांसाठी कार्यशाळेचे आयोजन

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातर्फे विद्यार्थी विकास अधिकारी व समान संधी कक्ष समन्वयकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळा अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्रांमध्ये वेगवेगळ्या तारखेला होणार असून विद्यापीठाच्या विद्याथ्र्यांकरिता असलेल्या विविध योजनांची माहिती विद्याथ्र्यांपर्यंत पोहचावी व योजनांचा लाभ घेता यावा या उद्देशाने सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून, संबंधित महाविद्यालयांमधील विद्यार्थी विकास अधिकारी तसेच समान संधी कक्षांच्या समन्वयकांना उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे.

कार्यशाळेचे वेळापत्रक
अकोला जिल्ह्रांतील विद्यार्थी विकास अधिकारी व समान संधी कक्ष समन्वयकांसाठी श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे 29 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजता, यवतमाळ जिल्ह्रांकरिता लोकनायक बापुजी अणे महिला महाविद्यालय येथे 31 जुलै रोजी सकाळी 10:00 वाजता., बुलढाणा जिल्ह्रांकरिता जिजामाता महाविद्यालय येथे 01 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजता., वाशिम जिल्ह्रांकरिता सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय येथे 02 ऑगस्ट रोजी सकाळी 10.00 वाजता, तर अमरावती जिल्ह्रांकरिता श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय येथे 06 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजता कार्यशाळा होणार आहे.
तरी विद्यार्थी विकास अधिकारी व समान संधी कक्ष समन्वयकांनी या कार्यशाळेला उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी केले आहे. अधिक माहितीकरिता डॉ. राजीव बोरकर यांचेशी संपर्क साधता येईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button