AmravatiLatest News

विद्यापीठातील संस्कृत विभागात दोन दिवसीय राष्ट्रीय लिपी कार्यशाळा संपन्न

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर संस्कृत विभाग व मालवीय मिशन टीचर ट्रेनिंग सेंटरच्यावतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय लिपी कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. कार्यशाळेला कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी भेट दिली. यावेळी प्रशिक्षणार्थीं विद्याथ्र्यांनी ब्रााह्मी लिपीचा उपयोग करून घड¬ाळ, बुकमार्क, कि चेन, शुभेच्छापत्र, दगडावर नावाची पाटी अशा अनेक वस्तू बनविल्या. विद्याथ्र्यांच्या या कलाकृतींची मान्यवरांनी पाहणी करुन कलाकृतींचे मान्यवरांनी कौतुक केले. कार्यशाळेला प्रमुख अतिथी व प्रशिक्षक म्हणून नागपूर येथील श्री आशिष जैन, विभागाच्या प्रा. प्रियंका मोहोड उपस्थित होते. या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये ब्राम्ही लिपिची अंकमाला, वर्णमाला व अक्षरमालाची माहिती, सांस्कृतिक ठेवा व अवगत ज्ञानाचा परिचय करून घेत लिपी शास्त्रामध्ये उपलब्ध असलेल्या संशोधन व रोजगार संधीची माहिती विद्याथ्र्यांनी जाणून घेतली.

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी ब्राहृी लिपिची उत्पत्ती झाली. ब्रााह्मी लिपी ही सर्वात प्रथम लिपी आहे. ब्रााह्मी लिपी नंतर अनेक लिपी निदर्शनास आल्या. ब्रााह्मी लिपीमध्ये सम्राट अशोकाच्या काळातील अनेक शिलालेख आढळून येतात. ज्यामुळे अशोकाच्या इतिहासकालीन बहुमूल्य वारसाचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी लक्षात येते. प्रशिक्षणार्थींनी ब्रााह्मी लिपीतील शिलालेख, ताम्रलेख, हस्तलिखित आदी पुरातन साहित्य संपदा तसेच आधुनिक उपलब्धतेशी ब्रााह्मी लिपीला जोडण्याचे कौशल्य विद्याथ्र्यांनी अवगत केले.

आयुर्वेदातील अनेक सिध्दांत ब्रााह्मी लिपीमध्ये आढळतात. या सर्व सिध्दांताचे गुढ उकलण्यास कार्यशाळेची मदत झाली असे मनोगत विद्याथ्र्यांनी व्यक्त केले. ब्रााह्मी लिपीला व्यावसायिक रोजगार संधी म्हणून बघण्याची संकल्पना या कार्यशाळेच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आली.

विद्यापीठ गीत व भगवती माता सरस्वतीचे प्रतिमा पूजन, माल्यार्पण व दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेची सुरुवात झाली. विभागाची विद्यार्थीनी कु. अमृता कोरडे हिने गायिलेल्या स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. उद्घाटन सत्राला प्रा. प्रियंका मोहोड यांनी उदबोधन केले. प्रास्ताविक डॉ. राहुल लोधा यांनी, तर आभार प्रा. स्वप्ना यावले यांनी मानले.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाच्या समन्वयक डॉ. संयोगिता देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून श्री आशिष जैन, प्रा. प्रियंका मोडोड, श्रीमती नरसम्मा कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. दत्तात्रय रत्नपारखी, विद्यापीठ मराठी विभागाचे डॉ. प्रणव कोलते उपस्थित होते. तसेच संस्कृत भारतीचे जनपद प्रमुख श्री उल्हास बपोरीकर, डॉ. राजीव मुलमुले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. सूत्रसंचालन कु. मयुरी अर्मळ, पाहुण्यांचा परिचय डॉ. श्रद्धा बोबडे यांनी करुन दिला. सरस्वती वंदना मीरा भेरडे आणि भार्गव लोधा यांनी गायिली. आभार प्रा. श्वेता बडगुजर यांनी मानले. ब्रााह्मी लिपीचे महत्त्वपूर्ण ज्ञान सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यशाळेला देशाच्या विविध भागातील प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, वैद्यकशास्त्राचे विद्यार्थी, अधिवक्ता, व्यावसायिक, जिज्ञासू मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button