Latest NewsNanded

धक्कादायक! नायगाव ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात पत्त्याचा डाव, रुग्णवाहिकेचा वापर जुगारासाठी

नांदेड: नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील ग्रामीण रुग्णालय पुन्हा एकदा चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आले आहे. रुग्णालयाच्या आवारातच सर्रासपणे पत्त्याचा डाव सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही, तर रुग्णवाहिकेचा (ॲम्बुलन्स) वापर चक्क पत्ते खेळण्यासाठी केला जात असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

कालच नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड येथे रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे एका गर्भवती मातेला रस्त्यातच प्रसूती करावी लागल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. अशा गंभीर परिस्थितीत नायगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांचे हे असंवेदनशील कृत्य उघडकीस आले आहे, ज्यामुळे वरिष्ठांचे यावर अजिबात लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे.

रुग्णालय आणि रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठीच असतात. मात्र, नायगावमध्ये त्यांचा गैरवापर होताना दिसत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पत्त्याचा डाव मांडणाऱ्यांवर तसेच संबंधित रुग्णालय प्रमुख अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील ढिसाळ कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button