AmravatiLatest News

“सफाई अपनावो, बिमारी भगावो” उपक्रमांतर्गत मनपा मुख्यालयात स्पिटिंग बिन्सचा शुभारंभ

अमरावती – अमरावती केंद्र शासनाच्या “सफाई अपनावो, बिमारी भगावो” या अभियानांतर्गत आज मनपा मुख्यालयामध्ये प्रायोगिक तत्वावर स्पिटिंग बिन्स बसविण्यात आले. या उपक्रमाचा शुभारंभ मा. अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाला.

हे स्पिटिंग बिन्स मनपा करिता श्री. राहुल डहाके, श्री. गुरुदेव एजेंसी, अमरावती यांच्या मार्फत प्रायोगिक तत्वावर भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले आहेत.

या वेळी मा. अतिरिक्त आयुक्त यांनी स्पिटिंग बिन्सच्या महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या की, हे बिन्स पोर्टेबल, पुन्हा वापरता येणारे व गळती प्रतिरोधक रचनेत तयार करण्यात आले असून, सार्वजनिक स्वच्छतेस हातभार लावणारे आहेत. यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व जैव-घातक कचरा टाकणे यावर प्रभावी नियंत्रण ठेवता येईल.

या बिन्समध्ये सुपर शोषक पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, द्रव कचरा काही मिनिटांत घनीकरण करून प्रसन्न सुगंध निर्माण करतो. हे बिन्स जैवविघटनक्षम असल्यामुळे पर्यावरणपूरक असून, वापरानंतर 15 दिवसांत विघटन होण्यास सुरूवात होते. द्रव एकदा घन झाल्यानंतर परत द्रवरूप होत नाही, यामुळे ते पूर्णतः स्वच्छतेस अनुकूल आहेत.

या कार्यक्रमाला जेष्ठ स्वास्थ निरीक्षक श्री. बुरे, स्वच्छ भारत अभियान समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक श्री. हडाले आणि एजेंसीचे प्रोप्रायटर श्री. राहुल डहाके आदी मान्यवर उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button