महानगरपालिका झोन क्रमांक ०५ व अतिक्रमण विभागाद्वारे संयुक्तपणे अतिक्रमण काढण्याची कार्यवाही
अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ०५ आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे ड्रीम पार्कजवळील मारुती नगर व गडगडेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई केली.
सदर भागात स्थानिक रहिवाशांनी सार्वजनिक नालीवर काँक्रीट रॅम्प, शेड, दळण केंद्र, दुकाने आणि कंपाउंड भिंती उभारून सार्वजनिक जागेचा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केला होता. परिणामी सार्वजनिक नालीचे नवीन बांधकाम रखडले होते.
महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या स्पष्ट निर्देशानुसार शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत जेसीबी मशिनीद्वारे ही अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली.
या कारवाईनंतर संबंधित मुख्य रस्त्याची दोन्ही बाजूंनी सुमारे ३० फूट रुंदी वाढणार आहे, जे भविष्यात वाहतूक सुरळीत करण्यात मोठी मदत करणार आहे.
पोलीस बंदोबस्त आणि प्रशासनाचा समन्वय:
सदर मोहिमेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच झोन ०५ चे उपअभियंता विवेक देशमुख, शाखा अभियंता मनोज शहाळे, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख योगेश कोल्हे, अभियंता प्रवीण भेंडे, निरीक्षक अन्सार अहमद, शुभम पांडे, बबलू सोनवणे यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस दल उपस्थित होते.



