विद्यापीठातील गणित विभागाची शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल

अमरावती : पदव्युत्तर शिक्षण व संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने स्थापन झालेला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील गणित विभाग आपल्या उल्लेखनीय कार्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत आहे. एम.एस्सी., पीएच.डी. अभ्यासक्रमांसह संशोधन क्षेत्रातही आघाडीवर आहे.
संशोधन प्रकल्पामध्ये विभागाचे यश
संशोधनाचे मुख्य क्षेत्र सापेक्षता आणि विश्वविज्ञान असून, विभागातील 40 पेक्षा अधिक विद्याथ्र्यांनी यशस्वीरित्या आचार्य पदवी प्राप्त केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अर्थसहाय्याने विभागाने दोन संशोधन प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. 2005 व 2015 या वर्षात आइन्स्टाईनच्या विशेष व सामान्य सापेक्षता सिध्दांताच्या शताब्दी वर्षानिमित्त विभागाने आय.सी.आर.-2005 आणि आय.सी.जी.आर.-2015 या दोन आंतरराष्ट्रीय परिषदांचे केलेले आयोजन शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत मानाची बाब मानल्या गेली.
राष्ट्रीय परिषदांचे यशस्वी आयोजन
रौप्य महोत्सवी वर्षाच्या पार्·ाभूमीवर विभागाने गणित विज्ञानातील अलिकडच्या प्रगतीवरील राष्ट्रीय परिषद आयोजित करून देशभरातील अभ्यासकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विभागातील 25 हून अधिक विद्यार्थ्यांनी नेट, सेट,गेट सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विभागातील काही संशोधन विद्याथ्र्यांनी इन्स्पायर फेलोशिप अंतर्गत संशोधन केलेले आहे.
अनेक विद्यार्थी मोठमोठ¬ा संस्थांमध्ये कार्यरत
विभागाचे अनेक विद्यार्थी प्राध्यापक, शोध संस्थांमध्ये संशोधक, डेटा सायन्स आणि अॅनालिस्ट, ऑपरेशन रिसर्च, फायनान्स व बँकिंग अशा अनेक क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त एम.पी.एस.सी., यू.पी.एस.सी., एस.एस.सी., बँकिंग या परीक्षांमध्ये गणिताचा विशेष उपयोग होतो. जी.आर.ई., टी.ओ.ई.एफ.एल. यांसारख्या परीक्षा देऊन परदेशामधील विद्यापीठांमध्ये पुढील शिक्षणासाठी संधी उपलब्ध आहे. येणा-या काळात इस्त्रो, डी.आर.डी.ओ., आर.बी.आय., सेबी आणि खाजगी बैंकिंग क्षेत्रात वैज्ञानिक, विश्लेषक पदांची गरज निर्माण होणार आहे.
विद्याथ्र्यांसाठी सुविधा
गणिताच्या विद्याथ्र्यांना मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंस यासारखे काही कोर्सेस करून अशा क्षेत्रात विशेष प्राध्यान्य मिळते. गेल्या तीन दशकांत विभागाने विद्याथ्र्यांना संधी, मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून देत उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा जोपासली आहे. विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विभागामध्ये गणित दिवस, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम, माजी विद्यार्थी मेळावा असे अनेक कार्यक्रम राबविले जातात. याव्यतिरिक्त विद्यापीठामध्ये मुला – मुलींचे स्वतंत्र वसतिगृह, कमवा-शिकवा योजना, इनक्युबेशन सेंटर, सेंट्रल लायब्रारी, वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचे व्याख्याने, खेळ, क्रीडा मैदाने, स्वीमिंग पूल, आधुनिक जीम, पोस्ट ऑफिस, एटीएम, निसर्ग रम्य वातावरण इत्यादीचा विद्याथ्र्यांना व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोग होतो. भविष्यातही गणिताच्या क्षेत्रात नवनवीन संशोधन घडवण्याचा विभागाचा निर्धार आहे. विद्याथ्र्यांनी पदव्युत्तर गणित विभागामध्ये आपले प्रवेश निश्चित करण्याकरिता व अधिक माहितीकरिता विभागप्रमुख यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.



