“माहूर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम”

माहूर : “अंमली पदार्थांच्या सेवनाने अनेकांची स्वप्नं उद्ध्वस्त होतात, तर काही प्रतिभावान विद्यार्थ्यांचे आयुष्य कायमचे अंधारात लोपते,” असे स्पष्ट शब्दांत प्रतिपादन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केलं.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त माहूर पोलीस ठाण्यात 26 जून रोजी सकाळी 10 वाजता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी श्री रेणुकादेवी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे आरोग्यावर व मानसिकतेवर होणारे परिणाम, गुन्हेगारीकडे जाण्याचा धोका, आणि त्यातून सुटका करण्याचे मार्ग याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर –
कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विजय आमले, ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, जयकुमार अडकीने, अपील बेलखोडे, गोपाल खापर्डे, शंकर भालेराव, राजू दराडे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
याशिवाय पोलीस उपनिरीक्षक संदीप अनेबोईनवाड, पालमसिंग ब्राम्हण, पोहेकॉ. खंदारे, चालक जाधव, पोकॉ. गजानन जाधव, डगवाल, राऊत, महिला पोहेकॉ. पुसनाके, पोकॉ. भुरके आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाले.
सामाजिक संदेश –
पो.नि. कराड यांनी उपस्थितांना आवाहन केलं की, “अंमली पदार्थांचं सेवन हे स्वतःच्या आयुष्याविरुद्धचा गुन्हा आहे. आपण सजग राहिलो, तर आपली पिढी या विळख्यातून वाचू शकते. प्रत्येकाने किमान एक जनजागृती उपक्रम राबवावा.”



