AmravatiLatest News

विदर्भाचे गौरव! गजाननदादा मोहोड आणि अनुपदादा गाडगे यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार

अमरावती : तिवसा तालुक्यातून पत्रकारितेची सुरुवात करून आज संपूर्ण अमरावती जिल्हा नव्हे, तर संपूर्ण विदर्भात स्वतंत्र ओळख निर्माण करणारे व सत्यशोधक पत्रकारितेचा आदर्श निर्माण करणारे दोन मान्यवर पत्रकार — दै. लोकमतचे गजाननदादा मोहोड व दिव्य मराठीचे अनुपदादा गाडगे — यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.

या दोन्ही पत्रकारांनी ग्रामीण भागातील समस्या, विकासकामांची पारदर्शकता, प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयांविरोधातील निर्भीड भूमिका आणि सामाजिक जाणीव जपणारी पत्रकारिता अशा विविध पातळ्यांवर आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या पत्रकारितेमुळे अनेक वेळा जनतेच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आल्या आणि त्यावर उपाययोजनाही झाली.

गजाननदादा मोहोड यांनी स्थानिक ते प्रादेशिक स्तरावर अनेक महत्त्वाच्या घडामोडी उघडकीस आणल्या असून, त्यांच्या विश्लेषणात्मक शैलीने पत्रकारितेला नवसंजीवनी दिली आहे.
तर अनुपदादा गाडगे यांनी सामाजिक प्रश्नांवर अत्यंत संवेदनशीलतेने लेखन करत जनजागृती केली आहे.

या दोघांचा गौरव संपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. त्यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन…!

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button