Amaravti GraminAmravatiLatest News

भातकुली पं.स. अंतर्गत इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रम प्रशिक्षणास उत्साही सुरुवात

अमरावती : पंचायत समिती भातकुली अंतर्गत मराठी माध्यमातील इयत्ता पहिलीचे तीन दिवसीय शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाला 9 जूनपासून उत्साहात सुरुवात झाली. हे प्रशिक्षण अमरावतीतील गोल्डन किड्स विद्यालय येथे आयोजित करण्यात आले असून यामध्ये भातकुली तालुक्यातील सुमारे 80 शिक्षक सहभागी झाले आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू
सन 2025-26 पासून इयत्ता पहिलीसाठी नव्याने लागू होणाऱ्या CBSE पॅटर्नच्या अभ्यासक्रम व मुल्यमापन पद्धतीच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण घेतले जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत या अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होत आहे.

  • प्रशिक्षणाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत
    प्रशिक्षणाचा शुभारंभ सकाळी 10 वाजता करण्यात आला. यावेळी
  • रामेश्वरजी माळवे (शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स. भातकुली)
  • शकील अहमद खान (शिक्षण विस्तार अधिकारी, पं.स. भातकुली)
  • उमाकांत सिंगरोल (मुख्याध्यापक, गोल्डन किड्स विद्यालय)
  • चंद्रकांत कडबे (विषय साधन व्यक्ती, पं.स. भातकुली)
    यांची प्रमुख उपस्थिती होती.

उद्घाटन प्रसंगी वातावरणात उत्साह आणि आत्मीयता दिसून आली. प्रशिक्षणात सहभागी शिक्षकांसह अधिकाऱ्यांनीही बालगीते व कृतियुक्त गीतांवर ठेका धरला.

  • प्रशिक्षणात वैविध्यपूर्ण मुद्द्यांचा समावेश
    या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये
  • कृतियुक्त शिक्षण
  • अध्ययन निष्पत्तीवर आधारित अनुभव
  • विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास
  • व्यावसायिक शिक्षणाचे तत्त्व
    यावर सखोल मार्गदर्शन केले जात आहे.
  • तज्ञ मार्गदर्शक म्हणून:
  • राजकुमार गंगराळे
  • देवकी औघड मॅडम
  • ज्योती सानप मॅडम
    हे मार्गदर्शन करत आहेत, तर प्रशिक्षण समन्वयक म्हणून चंद्रकांत कडबे सर जबाबदारी पार पाडत आहेत.

प्रशिक्षण स्थळी भोजनाचीही योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. प्रसार माध्यम प्रमुख राजेश सावरकर यांनी याबाबत माहिती दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button