AMCActionAmravaticitynews

अमरावती मनपा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; महापौरांच्या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

महापौर श्रीचंद तेजवानी, आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासोबत झालेल्या चर्चेला यश; मनपा कर्मचाऱ्यांचे कामकाज पूर्ववत

अमरावती : अमरावती महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी-कामगार संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू केलेला संप अखेर मागे घेतला आहे. महापौर श्रीचंद तेजवानी यांच्यासह महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंगळवारी, २५ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेत पदाधिकारी आणि कर्मचारी-कामगार संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत त्या मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या चर्चेनंतर कर्मचारी संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला असून, महानगरपालिकेतील कामकाज पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संपामुळे प्रभावित झालेल्या मनपाच्या प्रशासकीय कामकाजाला आता गती मिळण्याची अपेक्षा आहे.

या बैठकीला महापौर श्रीचंद तेजवानी, मनपा आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेते चेतन गावंडे, विरोधी पक्षनेते विलास इंगोले, नगरसेवक अजय जयस्वाल, कर्मचारी व कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश पांडे, सरचिटणीस आकाश तिरथकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button