citynewsWashim

कामरगावमध्ये डेंग्यूचा फैलाव; शाळकरी विद्यार्थ्यांना लागण, ग्रामस्थांचा संताप

आढळल्यानंतरच आरोग्य विभाग आणि प्रशासनाला गावाची आठवण होते का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. रुग्ण आनियमित स्वच्छतेचा अभाव आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आरोप; निष्काळजी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

कामरगाव, वाशिम : वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामरगावमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनाही डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या परिस्थितीला नियमित स्वच्छतेचा अभाव आणि प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

गावात कायमस्वरूपी सफाई कर्मचारी नियुक्त असतानाही केवळ वरवरची साफसफाई केली जाते. नाल्यांची नियमित स्वच्छता होत नाही, तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचीही वेळोवेळी स्वच्छता केली जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वर्षभर स्वच्छतेचे नियोजन आणि अंमलबजावणी झाली असती, तर आज डेंग्यूच्या प्रादुर्भावाला आळा घालणे शक्य झाले असते, अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

“एखादी दुर्घटना घडल्यानंतर किंवा रुग्ण ढळल्यानंतर तात्पुरती ब्लीचिंग पावडर टाकून उपाययोजना करण्यापेक्षा नियमित स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, वरिष्ठ अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरोग्य अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष गावातील परिस्थितीची पाहणी करण्याऐवजी केवळ ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन परत जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामरगावसारख्या मोठ्या गावात स्वच्छतेचे प्रभावी नियोजन करणे आणि त्याची नियमित अंमलबजावणी करणे ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता गावात तातडीने व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, नाल्यांची व पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता करावी, तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. यासोबतच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी कामरगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button