वारकरी समुदाय संपर्क प्रमुखपदी दत्ता महाराज देवघरे यांची नियुक्ती

विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताचा निर्णय; सिद्धेश्वर महादेव मंदिरात भव्य सत्कार सोहळा
अमरावती : विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने अमरावती जिल्ह्याच्या वारकरी समुदाय संपर्क प्रमुखपदी दत्ता महाराज देवघरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दत्ता महाराज देवघरे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला वारकरी समुदायातील सदस्य, विविध धार्मिक संस्थांचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
दत्ता महाराज देवघरे यांच्या नियुक्तीमुळे वारकरी समुदायात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या माध्यमातून वारकरी समुदाय आणि विविध धार्मिक संस्थांमधील समन्वय अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



