citynewslatestnewss breakingnewsNanded

खासगी फायनान्स कंपन्यांचे कंबरडे मोडणे ही आमची जबाबदारी! – मनोज जरांगे पाटील

मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट; न्यायासाठी लढण्याचा दिला शब्द, तपासावर लक्ष ठेवणार

नांदेड (प्रतिनिधी) : खासगी फायनान्स कंपनीच्या कथित जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप असलेल्या मयत शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबीयांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रात्री उशिरा भेट घेतली. मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे जाऊन त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला आणि गावकऱ्यांशी संवाद साधला.

काही दिवसांपूर्वी नांदेड शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चंद्रकांत शिंदे यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. फायनान्स कंपनीकडून कर्जवसुलीसाठी होत असलेल्या कथित तगाद्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने शिंदे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

या भेटीदरम्यान जरांगे पाटील यांनी कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून, त्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे. तपास योग्य दिशेने सुरू असल्याने सध्या त्यात हस्तक्षेप करणे उचित ठरणार नाही. मात्र, तपासात काही त्रुटी आढळल्यास किंवा योग्य न्याय मिळत नसल्याचे दिसल्यास आपण कुटुंबाच्या न्यायहक्कासाठी लढा देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

एसआयटीमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचेही जरांगे पाटील यांनी सांगितले. खासगी फायनान्स कंपन्यांचे जाळे मोठे असून, अशा कंपन्यांच्या कथित मनमानीला आळा घालणे आवश्यक आहे. खासगी फायनान्स कंपन्यांचे कंबरडे मोडणे ही आमची जबाबदारी असल्याचा आक्रमक इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, शिंदे कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि या प्रकरणातील सत्य समोर यावे, यासाठी तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाईट : मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button